‘त्यांनी तारतम्य बाळगायला हवं’; राष्ट्रवादी नेत्याचा वळसे पाटील यांना खोचक सल्ला
राष्ट्रवादी अजित पवार गेटाचे नेते तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडू शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यावरून आता नवा वाद समोर येत आहे. तर वळसे पाटील यांच्यावर शरद पवार गटाकडून आता निशाना साधला जात आहे.
नागपूर : 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अजित पवार गटाकडून वार-पलटवार केले जात आहेत. त्यांना टार्गेट केलं जात आहे. याचदरम्यान शरद पवार यांचे निटकवर्तीय मानले जाणाऱ्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्यावर बोचरी टीका करताना प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी ते देशातील मोठे नेते आहेत. मात्र त्यांना राज्यात स्वबळावर एकदाही मुख्यमंत्री करता आला नाही. किंवा राज्यात स्वबळावर सत्ता आणता आली नाही अशी टीका केली होती. ज्यानंतर त्यांच्यावर शरद पवार गटातील नेत्यांनी सडकून टीका केली. याचमुद्द्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वळसे पाटील यांच्यावर निशाना साधला आहे. तर त्यांना यावेळी सल्ला देखील दिला आहे. त्यांनी, सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्रात राजकारणात स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. दिलीप वळसे पाटील अनेक वर्षे पवार साहेब यांच्याबाबत काम केलं आहे. त्यांनी तारतम्य बाळगायला हवं. नाही तर त्यांच्या जिल्ह्यातील लोकच त्यांना धडा शिकवतील.