कुकडी पाणी प्रश्न पेटला? ‘छाताडावर गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही’; वळसे पाटील यांचा सरकारला इशारा
या पाण्याच्या वादावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आमने- सामने आले आहेत. यावरून वळसे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत.
जुन्नर/पुणे : जुन्नर आणि नगर या दोन तालुक्यामध्ये कुकडी पाण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या पाण्याच्या वादावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आमने- सामने आले आहेत. यावरून वळसे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाण्यावरून वळसे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका करताना, कुकडीचे पाणी नगरचे भाजपचे मंत्री पळवत असल्याचं म्हटलं आहे. तर पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू. वेळ प्रसंगी पोलीसांनी अटक केली तरी छाताडावर गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही अशा शब्दात वळसे पाटील यांनी कुकडी पाणी प्रश्नावरून सरकारला इशारा दिलाय.
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम

