अजित दादांच्या बीड दौऱ्याला आजारी असल्यानं दांडी अन् फॅशन शोच्या कार्यक्रमाला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
अजित पवार काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळाले. बीड दौऱ्यावर असताना अजित पवार यांना निवदेन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. मात्र धनंजय मुंडे यांची गैरहजेरी पाहायला मिळाली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मात्र माजी मंत्री धनंजय मुंजे हे आजारी असल्याचं सांगून अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केलं होतं. ‘उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने उपचारासाठी मुंबई येथे जावे लागणार आहे. त्यामुळे बीडमधील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. यानंतरही उलटसुलट चर्चा होताना दिसताय. धनंजय मुंडे अजित पवार यांच्या दौऱ्यात गैरहजर असून ते काल रात्री गेट वे ऑफ इंडियाजवळ एका कार्यक्रमाला उपस्थित होते. मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यासंदर्भात अंजली दमानियांनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बघा काय म्हणाल्या?

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
