Bacchu Kadu : ‘त्याला भाजप संपवतो…म्हणून एकनाथ शिंदे अन् अजित पवारांची नार्को टेस्ट करा’, बच्चू कडूंचा निशाणा
बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजप छोट्या पक्षांना संपवतं तसेच भाजपबद्दल दादा शिंदे यांचं खरं मत जाणून घ्यायचं असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा. सगळं बाहेर येईल असा दावा बच्चू कडूंनी केलाय.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंनी अजित पवार शिंदेंना टोला लगावत भाजपवर निशाणा साधलाय. मित्रपक्ष फक्त दिसायला युतीत आहे. मात्र शिंदे आणि दादांची जर नार्को टेस्ट केली तर भाजपबद्दल त्यांचं खरं मत समोर येईल असा दावा कडूंनी केला. एवढेच नव्हे तर भाजपचं शिंदे आणि दादांसोबत बिनसल्यावर ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असाही दावा कडूंनी केला. तसंच युतीमध्ये जो पक्ष मोठा व्हायला लागतो त्याला भाजप संपवतो असाही आरोप त्यांनी केला. ‘अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत जर भाजपचा प्रेमभंग जर झाला तर उद्धव ठाकरेंसोबत त्यांचा नवीन प्रेमाची कहाणी सुरू होऊ शकते. मला वाटते त्याचा एक प्रयत्न असेल. त्या पद्धतीने भाजप नेहमी ते म्हणतात ना मोठ्या माश्याखाली लहान मासे असतो तो मोठ्या माशाला थोडं थोडं खात असतो आणि मग एक दिवस असा येतो की हा मोठा होतो आणि मग त्याला पूर्ण नष्ट करतोय. अशी भाजपची राजकारणीती आहे’, असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, शनिवारी बच्चू कडूंनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्ष पदचा राजीनामा दिला. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अत्यंत कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. बघा काय म्हणाले बच्चू कडू?