उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अन् भाजपकडून धक्का, माजी आमदारानं सोडली ठाकरेंची साथ
लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कामाला लागलेत. जनसंपर्क दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी ईडी कारवायांवरूनही भाजपवर निशाणा साधलाय.
मुंबई, २ फेब्रुवारी, २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कामाला लागलेत. कोकणाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यापासून उद्धव ठाकरे यांनी सुरूवात केली. छोटे खानी सभा घेत उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडलेत. मात्र भाजपने कोकणातूनच उद्धव ठाकरे यांना धक्का दिलाय. ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपचा हात पकडलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जनसंपर्क दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी ईडी कारवायांवरूनही भाजपवर निशाणा साधलाय. हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक आणि शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना दिलासा हीच मोदी गॅरंटी अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बघा स्पेशल रिपोर्ट…