Waghya Dog Controversy : संभाजीराजेंचं वाघ्या कुत्र्याबाबत पुन्हा भाष्य, ‘महाराजांना अग्नि दिला त्यावेळी…’
'महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने मग ते डाव्या, उजव्या किंवा सेंटर विचारसरणीचा असो, वाघ्या कुत्र्याचे पुरावे असल्याच म्हटलेलं नाही', असं माजी खासदार संभाजी राजे यांनी म्हटलं.
किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर याच मुद्द्यावरून संभाजी राजे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी देखील त्यांनी काही फोटो, पुरावे दाखवत वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यांना जो काही इतिहास आहे, शिवभक्तांनी माहिती अधिकारात जी माहिती मिळवलीय ती त्यांच्यासमोर मांडली. पुरातत्व खात्याने त्यात स्पष्टपणे नमूद केलय, वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारक म्हणून कुठेही नोंद नाही. या वाघ्या कु्त्र्याच स्मारक 1936 ला पू्र्ण झालं. 2036 पर्यंत हे स्मारक हटवलं नाही, अशी माहिती संभाजी राजेंनी दिली. पुढे ते असेही म्हणाले, आधी शिवभक्तांनी प्रयत्न केला, त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून मी हा मुद्दा घेतला असल्याचे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नि दिला, त्यावेळी त्यात वाघ्या कुत्र्याने उडी मारल्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही” असंही संभाजीराजे म्हणाले. यावेळी राजेंनी उपस्थित पत्रकारांना काही फोटो पुरावे म्हणून दाखवले.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं

Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल

भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
