महिला सरपंचाच्या पतीचा खून की…? मृतदेह आढळल्याने एकच खळबळ, संतप्त ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

| Updated on: Dec 10, 2024 | 1:02 PM

केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख असं अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही तासांनंतर तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे एक धक्कादायक घटना घडली. काल दुपारी अपहरण झालेल्या महिला सरपंचाच्या पतीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख असं अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. काही तासांनंतर तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही त्यामुळे मसाजोग येतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांची काल हत्या करण्यात आली. घटनेनंतर नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक झाले असून मारेकऱ्यांना अटक करा, या मागणीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून रस्ता रोको केल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्य रस्ता अडवून धरल्याने बीड – लातूर महामार्ग 70 किलो मीटरपर्यंत संपूर्णपणे ठप्प झाला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे मस्साजोग परिसरात तणाव वाढला आहे.

Published on: Dec 10, 2024 01:02 PM