बीआरएसचा प्रभाव वाढला; अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदारासह 35 सरपंच यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

बीआरएसचा प्रभाव वाढला; अहमदनगर जिल्ह्यातील माजी आमदारासह 35 सरपंच यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

| Updated on: Aug 13, 2023 | 10:57 AM

तर ग्रामीण भागातून BRS ला समर्थन मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनेक माजी सरपंच उपसरपंच यांनी थेट वाहनाने तेलंगणात जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. तर त्याच्याआधी बीआरएसचे नेते मुख्यमंत्री केसीआर यांनी सोलापूरमध्ये येऊन भगीरथ भालके याचा प्रवेश करून घेतला होता.

श्रीरामपुर/अहमदनगर, 13 ऑगस्ट 2023 | एकीकडे राज्यात राष्ट्रवादी, शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती सतत बदलत होत आहे. त्याचदरम्यान मात्र BRS हा एक नवा पर्याय मतदारांच्या समोर येत आहे. तर ग्रामीण भागातून BRS ला समर्थन मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनेक माजी सरपंच उपसरपंच यांनी थेट वाहनाने तेलंगणात जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. तर त्याच्याआधी बीआरएसचे नेते मुख्यमंत्री केसीआर यांनी सोलापूरमध्ये येऊन भगीरथ भालके याचा प्रवेश करून घेतला होता. त्यानंतर त्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा देखील केला. त्यात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. तर आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातीलही अनेक सरपंच बीआरएसमध्ये सामिल झालेत. राष्ट्रवादी, शिवसेना असा राजकीय प्रवास केलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शंभरून अधिक कार्यकर्त्यांसह हा प्रवेश केलाय. श्रीरामपूर तालुक्यातील 70 टक्के ग्रामपंचायतींवर आपलं राजकीय वर्चस्व असून 35 हुन अधिक सरपंच हे बीआरएसमध्ये सामिल झाल्याचे मुरकुटे यांनी म्हटलं आहे. तर आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात BRS हा मोठा पर्याय ठरणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय.

Published on: Aug 13, 2023 10:57 AM