‘पैसा आणि सत्तेचा माज उतरवणार, खुमखूमी असेल तर राजीनामा द्या’, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुणाला दिला इशारा
VIDEO | धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटाचा वाद विकोपाला, ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून टीका
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटात वाद विकोपाला गेला असुन आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यावर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी टीका केली. आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या सत्तेचा व पैशाचा माज जनता उतरवले, त्यांना बघून घेईल. मंत्री डॉ तानाजी सावंत याना खरी खुमखुमी असले तर त्यांनी राजीनामा द्यावा, निवडणुकीला सामोरे जावे, तुमचे डिपॉझिट जप्त होईल, कोणत्याही स्तिथीत निवडून येऊ देत नाही असे पाटील यांनी सांगितले. जनतेच्या विरोधामुळे मतदार संघात तुम्ही फिरण्याची ताकत नव्हती, उद्धव ठाकरे यांच्यामुळे तानाजी सावंत आमदार झाले. भैरवनाथ कारखाना कसा उभारला, शेतकऱ्यांच्या जमिनी कशा घेतल्या, काय केले याची पोलखोल करणार असे सांगत माढ्यावरुन आलेले सावंत यांचे पार्सल परत पाठविणार, सर्व पक्षांना विनंती करून एकत्र आणणार असे पाटील म्हणाले.