कोल्हापुरकरांवर पूराचे मळभ; सततच्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले

कोल्हापुरकरांवर पूराचे मळभ; सततच्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले

| Updated on: Jul 27, 2023 | 10:06 AM

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे एकूण चार दरवाजे उघडले आज उघडले आहेत.

कोल्हापूर, 27 जुलै 2023 | गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधील अनेक नद्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे एकूण चार दरवाजे उघडले आज उघडले आहेत. त्यामुळे कोल्हापुरला पुराचा धोका वाढला आहे. धरणातील सात दरवाज्यांपैकी 3, 4, 5 आणि 6 हे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. तर सध्या धरणातून 7112 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराजवळून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदी किणारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सतत पडणारा पाऊस आणि कोल्हापूर शहरात निर्माण झालेली पूरस्थिती पाहता येथे शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Published on: Jul 27, 2023 10:06 AM