PUNE | भोरमधील जिल्हा परिषदेच्या 100 विद्यार्थ्यांना दाखवला मोफत 'सुभेदार' चित्रपट

PUNE | भोरमधील जिल्हा परिषदेच्या 100 विद्यार्थ्यांना दाखवला मोफत ‘सुभेदार’ चित्रपट

| Updated on: Sep 04, 2023 | 12:29 PM

VIDEO | . शाळेतील विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानात भर पडावी म्हणून जिल्हा परिषदेच्या 100 विद्यार्थ्यांना दाखवला मोफत सुभेदार चित्रपट

पुणे, ४ सप्टेंबर २०२३ | पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या 100 विद्यार्थ्यांना, भोलावडे सरपंच ग्रुप तर्फे सुभेदार हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट मोफत दाखवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानात भर पडावी यासाठी हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटात नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी ऐतिहासिक पेहराव करून चिमुकले सिनेमागृहात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवाजी महाराज्यांच्या घोषनांनी चित्रपट गृहाचा परिसर दुमदुमुन गेला होता. भोलावडे सरपंच ग्रुपच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केलंय.

Published on: Sep 04, 2023 12:29 PM