Special Report : भाजप-शिवसेनेत वाद? गजानन किर्तीकरांकडून पहिली तक्रार, तर शिंदेंकडून मोदींचं कौतक
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दहा महिने झाले आहेत. आणि आता शिवसेनेकडून भाजपची पहिली तक्रार समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दहा महिने झाले आहेत. आणि आता शिवसेनेकडून भाजपची पहिली तक्रार समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. “आम्ही एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे त्या पद्धतीने आमची कामे झाली पाहिजे. घटक पक्षाला महत्त्व दिलं पाहिजे. पण दिलं जात नाही असं आमचं म्हणणं आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे”, असं किर्तीकर म्हणाले. तसेच आमची लोकसभेची 22 जागा लढण्याची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. किर्तीकर यांच्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे.दोनन्ही पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचं उघड झालं आहे. तर यावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किर्तीकर असं कुठेही बोलले नाहीत, असं बोलून यावर बोलणं टाळलं आहे. एकीकडे किर्तीकर यांनी भाजपवर आरोप केला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं तोंडभरून कौतुक केलं जात आहे. तसेच विरोधकांनीही यावरून भाजपला टार्गेट केलं आहे. शिवसेनेला 5 खासदार मिळाले तरी भरपूर आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 5 खासदार हे ठाकरे यांच्याकडे आहेत तर 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तोडगा कसा निघणार, यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…