शिंदेंच्या शिवसेनेचा 'हा' खासदार भाजपवर नाराज, म्हणाला, भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळतेय!

“शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हा’ खासदार भाजपवर नाराज, म्हणाला, भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळतेय”!

| Updated on: Aug 03, 2023 | 2:40 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांची भाजपाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांची भाजपाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीत भाजपकडून सेनेला सापत्न वागणूक मिळतेय, असं गजानन किर्तीकर म्हणाले. शिवसेनेचा एनडीएचा घटक पक्ष आहे, म्हणून आमची कामं झालीच पाहिजेत. घटक पक्षाला त्यांचा दर्जा दिला पाहिजे.भाजपकडून शिवसेनेला सापत्य वागणूक मिळतेय, अशी नाराजी गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केली. गजानन किर्तीकर यांच्या आरोपांनतर एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं यातून दिसून येतं. तसेच लोकसभेच्या 22 जागा आमच्या हक्काच्या असल्याचा दावा किर्तीकर यांनी केला.

Published on: May 26, 2023 01:20 PM