Ganesh Chaturthi 2023 | मुंबईतील नरेपार्कच्या राज्याला चांद्रयान-३ चा देखावा, बघा हत्तीवर रुढ असलेला बाप्पा

Ganesh Chaturthi 2023 | मुंबईतील नरेपार्कच्या राज्याला चांद्रयान-३ चा देखावा, बघा हत्तीवर रुढ असलेला बाप्पा

| Updated on: Sep 19, 2023 | 4:01 PM

VIDEO | चांद्रयान-३ ही मोहीम सर्वच भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट असून याचेच महत्व लक्षात घेता, यावर्षी मुंबईतील नरे पार्क येथील राजा परळचा गणपती या गणेशोत्सव मंडळाने चंद्रयान ३ चा देखावा साकारला.

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात आज गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होत असून घरोघरी बाप्पाचं आगमन झाले आहे. भारताच्या इतिहासात २३ ऑगस्टची संध्याकाळ सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला. कारण या दिवशी भारताच्या कपाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागला, कारणही तसंच होतं. ते म्हणजे चांद्रयान-३ मोहीम, चांद्रयान-३ ही मोहीम सर्वच भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट असून याचेच महत्व लक्षात घेता यावर्षी मुंबईतील नरे पार्क येथील राजा परळचा गणपती या गणेशोत्सवात चंद्रयान ३ च्या देखाव्याचे सुंदर नियोजन करण्यात आलेले आहे. परळचा राजाचे यावर्षी ७७ वे वर्ष असून यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत सार्वजनिक उपक्रम देखील राबवण्यात आलेले आहेत. यावर्षी गणरायाला सर्वांना सुखासामाधानाचे वर्ष जावो यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून गऱ्हाने घालत आशीर्वाद मागण्यात आलेले आहेत.

Published on: Sep 19, 2023 04:01 PM