Ganesh Chaturthi 2023 | Nitin Desai यांची पुण्यातील ‘या’ मंडळाची कलाकृती ठरली अखेरची, निधन होण्यापूर्वी केली होती सजावट
VIDEO | गणेशोत्सवात दरवर्षी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचं कला दिग्दर्शन करायचे मात्र, यंदा हुतात्मा बाबू गेनू मंडळाचं कला दिग्दर्शन शेवटचं ठरलं आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपले निधन होण्यापूर्वी सजावट सुरू केली होती.
पुणे, २७ सप्टेंबर २०२३ | राज्यात गणेशोत्सवाची धूम जोरदार सुरू आहे. आज गणेशोत्सवाचा नववा दिवस असून उद्या अनंतचतुर्दशी असल्याने बाप्पाचं विसर्जन होणार आहे. मुंबईप्रमाणे पुण्याच्या गणेशोत्सवाचा जल्लोष दरवर्षी पाहायला मिळतो. दरम्यान, सध्या चर्चा होतेय ती पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू गणेशोत्सव मंडळाची…कारण या मंडळाच्या गणेशोत्सवासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेलं होतं. दरम्यान, पुण्यातील या मंडळासाठी केलेलं कला दिग्दर्शन हे नितीन चंद्रकांत देसाई यांचं शेवटचं ठरलं आहे. हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा देखाव्याचं स्केच नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले होते. दरवर्षीचा बाबू गेनू मंडळाचा देखावा नितीन चंद्रकांत देसाई करायचे.
यावर्षी देखील चार धाम तयार करण्याचा मानस देसाई यांनी बाबू गेनू मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने यंदाच्या देखाव्याचे स्केच देखील तयार करून मंडळाच्या अध्यक्षांना देसाईंनी पाठवले होते. स्केच पाठवल्याच्या तिसऱ्या दिवशीच नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.