Ganesh Chaturthi 2023 | नाचणी, गहू ज्वारी आणि कडधान्यापासून साकारली बाप्पाची मनमोहक मूर्ती, बघा VIDEO

Ganesh Chaturthi 2023 | नाचणी, गहू ज्वारी आणि कडधान्यापासून साकारली बाप्पाची मनमोहक मूर्ती, बघा VIDEO

| Updated on: Sep 19, 2023 | 2:58 PM

VIDEO | मुंबईतील माकबा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नाचणी, गहू ज्वारी आणि कडधान्यापासून साकारली बाप्पाची मनमोहक मूर्ती, त्यामुळे ही मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बघा गणपतीची सुबक मुर्ती

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात आज गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होत असून घरोघरी बाप्पाचं आगमन झाले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात देखील बप्पाचे आगमन झाले असून भाविकांचा उत्साह पहिल्या दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील माकबा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बाप्पाची मनमोहक मूर्ती साकारली असल्याने सर्वत्र या बाप्पाची चर्चा आहे. माकबा चाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे ५३ वर्ष पूर्ण झाले असून यंदा या मंडळाचे ५४ वं वर्ष सुरू आहेत. गेल्या १० वर्षापासून याठिकाणी पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना केली जाते. यावर्षीदेखील मुंबईतील माकबा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपला पर्यावरण पूरक बाप्पाचा संकल्प जपला आहे. यंदा माकबा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नाचणी, गहू ज्वारी आणि इतर काही कडधान्यापासून मूर्ती बनवण्यात आली आहे. त्यामुळे ही मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Published on: Sep 19, 2023 02:58 PM