MSRTC : गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये ‘लालपरी’ मालामाल, 5 दिवसात ‘इतक्या’ कोटींची कमाई

सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झाले होते. नुकतेच मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी राज्यभरातील गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. गणेशोत्सव म्हटलं की मुंबईतील सर्वाधिक चाकरमानी हे कोकणात आपल्या गावी जात असतात. यासाठी ते लालपरी किंवा रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात.

MSRTC : गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल, 5 दिवसात 'इतक्या' कोटींची कमाई
| Updated on: Sep 20, 2024 | 5:26 PM

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी गणेशभक्तांना खासगी वाहनांचा प्रवास हा खिशाला परवणारा नसतो म्हणून ते लालपरीने प्रवास करणं पसंत करतात. गणेशोत्सवात सुखकर आणि परवडणाऱ्या प्रवासाच्या दृष्टीने गरीबरथ म्हणून चाकरमानी लालपरी अर्थात महामंडळाच्या एसटीचा प्रवास करत असतात. केवळ कोकणात जातानाच नाहीतर मुंबईत परतीचा प्रवास करतानाही चाकरमानी लालपरीनेच येताना दिसताय. गणेशोत्सव संपल्यानंतर परतीच्या फेऱ्यांमध्ये लालपरी अर्थात राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस मालामाल बनली आहे. अवघ्या 5 दिवसात तब्बल 3 कोटी होऊन अधिक उत्पन्न रत्नागिरीतील बस आगाराला मिळाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात लालपरीच्या परतीच्या फेऱ्यांमुळे रत्नागिरी विभागाला चांगला नफा झाला आहे. गणेशोत्सव आटपून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांमुळे एसटी रत्नागिरी विभाग मालामाल झाला आहे. 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या चार दिवसात रत्नागिरीतून तब्बल 2 हजार 018 फेऱ्या मुंबईकडे सोडण्यात आल्या होत्या. यातून तब्बल 3 कोटी होऊन अधिक नफा एसटी विभागाला मिळाला असल्याने रत्नागिरीच्या लालपरीवर गणपती बाप्पाची कृपाच झाल्याचे म्हटले जात आहे.

Follow us
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.