Ganpat Gaikwad Firing |  या गोळीबाराला मुख्यमंत्रीच जबाबदार, संजय राऊत यांचा आरोप

Ganpat Gaikwad Firing | या गोळीबाराला मुख्यमंत्रीच जबाबदार, संजय राऊत यांचा आरोप

| Updated on: Feb 03, 2024 | 6:32 PM

कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर बेछुट गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या राज्यात माफीया आणि गुंडाचे राज्य चालू आहे. पुण्यात चार गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना जामिनावर बाहेर काढले त्यातूनच एका गुंडाचा खून झाला. गुंडांना निवडणूका जिंकण्यासाठी बाहेर काढले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हा प्रकार उल्हासनगरातील नसून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातलाच हा प्रकार आहे. गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाड यांनी आपण मन:स्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हा गोळीबार केला असल्याचे निवदेन पोलिसांना दिले आहे. आपण त्यांच्या कृत्याचे समर्थन करीत नाही, परंतू गणपत गायकवाड तीन टर्म पेक्षा जास्त वेळ आमदार झाले आहेत. त्यांचा बहुतांश काळ भाजपात गेला आहे. त्यांचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या गोळीबाराला एकनाथ शिंदेच जबाबदार आहेत. गृहमंत्री म्हणतात कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे केवळ शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठीच का ? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

Published on: Feb 03, 2024 06:31 PM