Ganpat Gaikwad Firing | यांची कॅबिनेट मधली गुंडागर्दी आता रस्त्यावर उतरली आहे, यशोमती ठाकूर यांची टीका
भाजपाचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यावरच पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अमरावतीच्या कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
अमरावती | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॉंग्रेस नेत्यांची डुकरांबरोबर केली आहे. याबद्दल कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे स्वत:ची संस्कृती दाखवत असल्याचे म्हटले आहे. अनिल बोंडे यांचे डोके फिरलेले दिसतंय त्यांना ट्रीटमेंट करायची गरज आहे. ते नेहमीच घृणास्पद बोलतात. त्यावरुन त्यांची मानसिकता दिसते. एखाद्या साध्या शेतकऱ्याच्या पोरानं ज्याचं घर नाही त्याने त्यांचा पराभव केला आहे. त्यांनी वाद पेटवून दंगल घडविली म्हणून भाजपावाल्याने त्यांना खासदारकी दिल्याचे ठाकूर यांनी म्हटले. कल्याणचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारप्रकरणात यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे वैभव गुजरातला न्यायचे आणि बिहारची संस्कृती येथे आणायची सरकारचा प्रयत्न आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही ठीक चाललं आहे असे वाटत नाही. यांची कॅबिनेटमधील गुंडागर्दी रस्त्यावर आली असल्याचा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.