जीबीएमएम मंडळाने गणेशासाठी एसी हॉल केला बुक
गणेशोत्सवानिमित्त श्रींचे दर्शन घेण्यासाठा प्रचंड गर्दी होते, त्यामुळे वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा खोळंबा होतो. त्यामुळे रस्त्यावरील ही कोंडी टाळण्यासाठी जीबीएमएम अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव हा एसी हॉलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात श्रींच्या दर्शनासाठी रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने मुंबईतील जीबीएमएम या मंडळाने नामी शक्कल लढविली आहे. वाहतुकीचा प्रश्न निर्णाण होऊ नये यासाठी जीबीएमएम मंडळाने चक्क गणपतीच्या स्थापनेसाठी एसी हॉल बुक केला आहे. एसी हॉल बुक करुन गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त कांदिवलीतील लोहना महाराज वाडीचा एसी हॉल मंडळाकडून बुक करण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त श्रींचे दर्शन घेण्यासाठा प्रचंड गर्दी होते, त्यामुळे वाहतूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा खोळंबा होतो. त्यामुळे रस्त्यावरील ही कोंडी टाळण्यासाठी जीबीएमएम अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव हा एसी हॉलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने आता मंडळाच्यावतीने माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.