मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग सुरु, एकनाथ खडसेंचं डोक फिरलंय : गिरीश महाजन
खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.
गिरीश महाजन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. या टीकेपासून वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. या टीकेला आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे. खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.