मृग नक्षत्र लागले तरीही गोंदियात रखरखतं ऊन, तापमान पोहोचले ‘इतक्या’ अंशावर
VIDEO | गोदिंयामध्ये उन्हाच्या तीव्रतेत वाढ, मृग नक्षत्र लागले असतानाही उन्हापासून सुटका नाही
गोंदिया : मृग नक्षत्र लागले असूनही पावसाने काही हजेरी लावलेली नाही. उलट उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी जिल्हावासीयांना आता एक-एक दिवस काढणे कठीण जात असून, जून महिना भारी जात आहे. अशातच गुरुवारी (दि.8) जिल्ह्याचे तापमान 43.4 अंशांवर पोहोचले होते आणि गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. जून महिना सुरू झाला असून, 7 जूनपासून मृग नक्षत्र लागते. येथून पावसाला सुरुवात होते व उन्हाळ्यापासून सुटका मिळते; मात्र यंदा पाऊस, तर दूरपर्यंत दिसत नसून उलट पावसळ्यातही उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. हेच कारण आहे की, मागील आठवड्याभरापासून गोंदिया जिल्हा सातत्याने पहिला किंवा दुसरा क्रमांक जमून बसला आहे. उन्हाची रखरख काही होत नसून जिल्हावासीयांना मेसोबतच आता जून महिनाही काढणे कठीण जात आहे. एकदाचा पाऊस पडो व या उकाड्यापासून सुटका मिळो एवढीच जिल्हावासीयांची इच्छा आहे.