Gudhi Padawa 2023 : नाशिकची सर्वात उंच गुढी TV9 मराठीवर; काळाराम मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

Gudhi Padawa 2023 : नाशिकची सर्वात उंच गुढी TV9 मराठीवर; काळाराम मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

| Updated on: Mar 22, 2023 | 12:41 PM

Nashik Kalaram Mandir Gudhi Padawa 2023 : गुढीपाडव्याच्या निमित्ताने नाशकात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. काळाराम मंदिरात आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात होतेय. नाशिकची सर्वात उंच गुढी TV9 मराठीवर आपण पाहताय...

नाशिक : आज गुढीपाडवा. मराठी नववर्षाची आजपासून सुरूवात होत आहे. विविध ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे. आजपासून काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या सुरुवातीला कळसावर गुढी उभारली जाते. नाशिकच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात सर्वात उंच गुढीने होते. नाशिकच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत महिला पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या. लहान मुलीदेखील नऊवारी साडी नेसून, हाती लेझीम घेऊन सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

Published on: Mar 22, 2023 12:41 PM