मामू आणि भाईजान… प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते ठाकरे घराण्यात कुणाला उद्देशून म्हणाले?
मनोज जरांगे पाटील याला कोणताही संविधानिक अधिकार नाही, तो मागासवर्गीय नाही, तसे सर्वोच्च न्यायालयानेही ठरवले नाही असे असतानाही हिवाळी अधिवेशनात किंवा राजकारणात मनोज जरांगे पाटील याची चर्चा होते. पण कष्टकरी, मागासवर्गीय लोकांच्या समस्यांवर चर्चा होत नसल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले
मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : कांदिवली पूर्व येथील दामू नगर येथील स्थानिक नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. यासंदर्भात प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या भागाला भेट देत तेथील नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील याला कोणताही संविधानिक अधिकार नाही, तो मागासवर्गीय नाही, तसे सर्वोच्च न्यायालयानेही ठरवले नाही असे असतानाही हिवाळी अधिवेशनात किंवा राजकारणात मनोज जरांगे पाटील याची चर्चा होते. पण कष्टकरी, मागासवर्गीय लोकांच्या समस्यांवर चर्चा होत नसल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. तर सामान्य लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही कारण उद्धव मामू आणि आदित्य भाईजान यासारखे लोकं धारावीत रस्त्यावर उतरतात. कुणासाठी हा मोर्चा काढला? दामू नगर येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या त्यांना दिसत नाही, विरोधकांचे काम असतं प्रश्न उपस्थित करणं, असं म्हणत सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.