अरे काय चाललंय? जरांगे पाटील कितवी पास आहे? गुणरत्न सदावर्ते भडकले अन्…

| Updated on: Dec 18, 2023 | 9:05 PM

भुजबळ हे माळी समाजाचे असल्याने त्यांना हिणवलं जातंय. ते दिसत नाही का? कानात बोळे आहेत? डोळ्यात माती गेलीय का? असे म्हणत सदावर्ते यांनी सरकारला सवाल केला आहे. भुजबळ यांना वेड्याच्या दवाखान्यात न्या म्हणताय? जरांगे पाटील कोणत्या अधिकाराने म्हणतो? सदावर्ते नेमकं काय म्हणाले?

मुंबई, १८ डिसेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच जरांगे पाटील यांच्याकडून भुजबळांवर होणाऱ्या टीकेवर गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. भुजबळ हे माळी समाजाचे असल्याने त्यांना हिणवलं जातंय. ते दिसत नाही का? कानात बोळे आहेत? डोळ्यात माती गेलीय का? असे म्हणत सदावर्ते यांनी सरकारला सवाल केला आहे. भुजबळ यांना वेड्याच्या दवाखान्यात न्या म्हणताय? जरांगे पाटील कोणत्या अधिकाराने म्हणतो? असा सवालही त्यांनी केलाय. तर या महाराष्ट्रात संविधान चाललं पाहिजे. संविधान शाही या राज्यात आहे. लोकशाही आहे. राजेशाही, हुकूमशाही आणि जातीची शाही चालली नाही पाहिजे. जे काही चुकीचं असेल, इतर नेत्यांनी ब्र काढला तर पोलिसात तक्रार होते. त्यांना अटक होते. मग जरांगेंना कधी अटक होणार? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Published on: Dec 18, 2023 09:04 PM
… म्हणून शिंदे सरकारची फाटली, संजय राऊत यांच्या बंधूनं काय केला घणाघात?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम शेवटच्या घटका मोजतोय?, कुणी दिलं विष?; बघा स्पेशल रिपोर्ट