मराठा समाजातील काहींनी माझ्यावर हल्लाचा प्रयत्न केला, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

“मराठा समाजातील काहींनी माझ्यावर हल्लाचा प्रयत्न केला”, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 05, 2023 | 3:45 PM

निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत येत असतात. दरम्यान बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबई : निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत येत असतात. दरम्यान बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा समाजातील काही लोकांनी माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला”, असा आरोपच सदावर्ते यांनी केला आहे. “माझ्या घराखाली लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अडवलं. मी पोलिसात रीतसर तक्रार करणार आहे. मात्र रद्द झालेलं आरक्षण असं करून मराठा समाजाला कधीच मिळणार नाही, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. या आधीही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे.

Published on: Jun 05, 2023 03:45 PM