Gyanvapi Masjid Case: फिर्यादी राखी सिंग यांची CBI चौकशीसाठी वाराणसी कोर्टात धाव

Gyanvapi Masjid Case: फिर्यादी राखी सिंग यांची CBI चौकशीसाठी वाराणसी कोर्टात धाव

| Updated on: May 31, 2022 | 2:29 PM

आता या सर्वेचा व्हिडिओच (Video of survey)समोर आला आहे. या व्हिडिओत ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मंदिर, शिवलिंग असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. याप्रकरणी फिर्यादी राखी सिंग यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या ज्ञानवापी (Gyanvapi mosque) मशिदीवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेहे प्रकरण कोर्टातही गेलं आहेजिल्हा कोर्टाच्या आदेशानुसार ४ हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांच्या उपस्थितीत या मशिदीचा सर्वे करण्यात आला होतात्यावेळी त्या परिसरातील व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले होतेया सर्वेनंतर वजूखान्यात शिवलिंग (Shivling)असल्याचा युक्तीवाद हिंदू पक्षकारांनी केला होतातर ते शिवलिंग नसून कारंजा असल्याचे मुस्लीम पक्षकारांचे म्हणणे होतेकोर्टाने त्यानंतर हा परिसर सुरक्षित करण्याचे आदेश दिले होते. आता या सर्वेचा व्हिडिओच (Video of survey)समोर आला आहेया व्हिडिओत ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मंदिरशिवलिंग असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. याप्रकरणी फिर्यादी राखी सिंग यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Published on: May 31, 2022 02:29 PM