Pune | पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी केली अटक
हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या महिलेला अटक केली... अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव पुनम परमेश्वर देवकर असे असून तिच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या महिलेला अटक केली… अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव पुनम परमेश्वर देवकर असे असून तिच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या महिलेची ज्यावेळी चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.पुण्यातील चंदुकाका सराफ अँड सन्स, पुन. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्समध्ये आरोपी महिलेने हातचलाखीने चोरी केल्याचं उघड झालं आहे. ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करुन सोन्याच्या अंगठी ऐवजी बनावट अंगठी ठेवत असे. हडपसर पोलीस तपास करत आहेत….