Dhule | धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने भागात गारपीट, गारपीटीने मोठं नुकसान
अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 5 ते 8 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.
धुळे : राज्यात एकीकडे उष्णता जाणवत असतानाच राज्यातील उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे. याच्या आधीच हवामान विभागानं राज्यात अवकाळी पावसाचा इशाला दिला होता. त्याचबरोबर मराठवाड्यासह अकोला, वाशिम, अमरावतीत गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यांमध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत होते. दरम्यान खोरी टिटाने भागात गारपीट झाली. अचानक आलेल्या अवकाळीमुळे अनेकांची धांधल उडाली. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 5 ते 8 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.