IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा आता हार्दिक पांड्याच्या खांद्यावर

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा आता हार्दिक पांड्याच्या खांद्यावर

| Updated on: Dec 15, 2023 | 11:38 PM

गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्या याची घरवापसी झाली असून आता मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या नवा कर्णधार असणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात हार्दिक पंड्या मुंबईचा कॅप्टन असणार आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने ही मोठी खेळी केली आहे.

मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्या याची घरवापसी झाली असून आता मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या नवा कर्णधार असणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात हार्दिक पंड्या मुंबईचा कॅप्टन असणार आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने ही मोठी खेळी केली आहे. त्यामुळे आता आयपीएल 2024 मधील सर्वाधिक यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा आता हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. यानंतर मुंबई इंडियन्स संघाने सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा होताना दिसत आहे. रोहित शर्मा याला बाजूला करून मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्या याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. दरम्यान, टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर मुंबईतच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे.

Published on: Dec 15, 2023 11:38 PM