10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 13 April 2022

10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 13 April 2022

| Updated on: Apr 13, 2022 | 11:48 PM

मय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यानंतर नॉटरिचेबल असणारे सोमय्या थेट मुंबई विमान तळावर अवतरले. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांचा लवकरच चौकशीसाठी नंबर लागणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

मागील तीन चार दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या नॉटरिचेबल होते. कारण आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या आणि मुलागा नील सोमय्या यांना पोलिसांनी समन्स बजावला होता. किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी धावाधावही सुरू केली. मात्र सेशन कोर्टात त्यांची निराशा झाली. कारण सेशन कोर्टाने सोमय्या यांना दणका देत त्यांचा व त्यांच्या मुलाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर मात्र सोमय्या यांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला. सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यानंतर नॉटरिचेबल असणारे सोमय्या थेट मुंबई विमान तळावर अवतरले. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांचा लवकरच चौकशीसाठी नंबर लागणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.