thane Hospital Patient Death : ठाण्याच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव, 17 रुग्णांचा मृतू; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले कोणते संकेत?
एक आठवड्या ओलंडायच्या आत एका रात्रीत 17 रूग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्यात संताप निर्माण झाला आहे. तर फक्त एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून सध्या ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली असून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डीन यांना निलंबित करा अशी मागणी केली जात आहे.
पुणे, 13 ऑगस्ट 2023 | ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच आठवड्यात पुन्हा एकदा रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक आठवड्या ओलंडायच्या आत एका रात्रीत 17 रूग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्यात संताप निर्माण झाला आहे. तर फक्त एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून सध्या ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली असून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डीन यांना निलंबित करा अशी मागणी केली जात आहे. याचदरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यावरून प्रतिक्रिया दिली असून त्यांनी, सातत्याने या घटनेची माहिती आपण घेतो आहे. तर या बाबत आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. तर हे रूग्णालय वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत हे हॉस्पिटल आहे. पण मृत्यू हा मृत्यू असतो. त्यामुळे याची चौकशी केली जाईल. तर मृत्यू कशामुळे झाला याचा याचा अहवाल मागवला जाईल. जर यात डीनचे दुर्लक्ष झालं असेल तर अहवाल येताच कारवाई होईल. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघे ही लक्ष ठेऊन आहेत.