राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

| Updated on: May 02, 2022 | 9:22 AM

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या रवि राणा आणि नवनित राणा यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सध्या नवनीत राणा आणि रवि राणा हे राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात 6 तर रवि राणा यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहेत.  जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार असून, राणा दाम्पत्याला जामीन मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यापूर्वी तीस एप्रिलला सुनावणी झाली होती, यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.