चिपळूणमध्ये मुसळधार! रस्ते पाण्याखाली, नागरिकांचे हाल
काही भागात अतिवृष्टी झाली. या पवासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला नद्यांना आलेले पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली. तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला.
मुंबई : मान्सूनबाबत (Monsoon) महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस (rain) पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागांमध्ये सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. जून महिन्यात काही भागात पाऊस पडला तर काही भागात पाऊस पडला नाही, त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र त्यानंतर जुलैमध्ये सर्वदूर पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी झाली. या पवासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला नद्यांना आलेले पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली. तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत राज्यातील 116 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 231 पाळीव प्राणी दगावले आहेत. तसेच या पावसामुळे राज्यातील 2 हजार 86 घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस होऊन रस्ते पाण्याखाली गेलेत.