Hemangi Kavi Interview | बाई, बुब्स आणि ब्रा विषयावर हेमांगी कवीची मुलाखत, नेमकं काय म्हणाली ?

| Updated on: Jul 13, 2021 | 7:00 PM

 प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळने (Hemangi Kavi)  ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. हेमांगीच्या या पोस्टनंतर अनेकांनी मोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  त्यानंतरा आता याच विषयाला घेऊन हेमांगीने TV9मराठीशी बातचित केली आहे.

हेमांगी कवी काय म्हणाली?

आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं. मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे.  पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं, असं हेमांगी म्हणाली.

Published on: Jul 13, 2021 06:40 PM
Video | बाई, बुब्स आणि ब्रा; हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, नेमकं काय म्हणाली ?
Maharashtra Rain | राज्यात सर्वत्र 5 दिवस पावसाचा अंदाज