शिवसेना लोकसभेच्या किती जागा लढणार? ‘या’ खासदाराने आकडाच सांगितला…
आगामी लोकसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार आहे यावर राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना भाजपची युती असो. सध्या प्रत्येक पक्ष स्वतःच्या पक्षाचे आकडे जाहीर करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 22 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत.
हिंगोली : आगामी लोकसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार आहे यावर राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना भाजपची युती असो. सध्या प्रत्येक पक्ष स्वतःच्या पक्षाचे आकडे जाहीर करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 22 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत एकनाथ शिंदे यांनी १३ विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. याच पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी या बैठकीती झालेल्या चर्चेची माहिती दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत नुकतीच खासदारांची एक बैठक पार पडली, त्या बैठकित पूर्वी लोकसभेला 22 जागा होत्या त्या कायम ठेवण्याची मागणी भाजपकडे करण्यात येणार आहे. आणि बाळासाहेच्या शिवसेनेत जे 13 लोक आलेले आहेत त्यांच्या उमेदवाऱ्या निश्चित आहे”, हा शब्द अमित शाहा आणि मुख्यमंत्री यांनी दिलेलं असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.