BIG Breaking : ‘हिंदी’ भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे…
हिंदी भाषा सक्तीची.. असा राज्य सरकारकडून घेतलेल्या निर्णयानंतर सरकारवर चांगलीच टीका करण्यात आली होती. मात्र आता हिंदी भाषा ही बंधनकारक नसणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली आहे.
एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयला स्थगिती देण्यात आली आहे. यापुढे आता हिंदी भाषा ही राज्यात बंधनकारक नसणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यावेळी हिंदी भाषा ‘अनिवार्य’ या शब्दाला आम्ही स्थगिती देत आहोत, असं दादा भुसे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तर हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती देताना सुधारित शासन निर्णय जारी करणार असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले. तर मराठी, इंग्रजीसह ज्यांना हिंदी भाषा शिकायची असेल त्यांनी हिंदी शिकवली जाईल पण हिंदी भाषा आता बंधनकारक असणार नाही, असही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आताच्या घडीला हिंदी विषय ऐच्छिक ठेवणार आहोत. इतर विषयासंदर्भात आपण निर्णय घेऊ. जे विद्यार्थी हिंदी भाषेसाठी इच्छुक असतील त्यांना मराठी, इंग्रजीसोबत हिंदी विषय शिकवला जाईल. या संदर्भातला शासन निर्णय यथावकाश निर्गमित केला जाईल, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.