Pune MNS Banner | हिंदूंचा हिंदूस्थान, मनसेचा नवा अजेंडा, पुण्यात बॅनरबाजी
Pune MNS Banner | हिंदूंचा हिंदूस्थान, मनसेच्या या नव्या अजेंड्याचे पुणेकरांना दर्शन झाले.
Pune MNS Banner | हिंदूंचा हिंदूस्थान, मनसेच्या (MNS)या नव्या अजेंड्याचे (Agenda) गुरुवारी पुणेकरांना (Punekar) दर्शन झाले. पुण्यात चौका चौकात मनसेने त्यांच्या नव्या विचारांची कास धरली आहे. या विचाराचे बॅनर आता चौका चौकात झळकू लागले आहे. ” आता भारत नाही, हिंदूंचा हिंदूस्थान”, असे बॅनर (Banner) झळकले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठी मुद्यावर फारकत घेत हिंदू अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा आयोध्या दौरा पूर्ण होऊ शकला नाही. मात्र औरंगाबादच्या जाहीर सभेपूर्वी राज ठाकरे यांनी भोग्यांवरील अजाणचा मुद्या चांगलाच तापवला होता. अजाणला विरोध नाही मात्र भोग्यांना विरोध असल्याचे त्यांनी पुणे, औरंगाबादच्या जाहीर सभेत सांगितले होते. त्याचे राज्यभर पडसाद ही उमटले होते. भोंगे बदल झाले नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यापुढे जात हिंदू जननायक (Hindu Jannayak) असा नवा अवतार त्यांनी धारण केला. आता पुण्यात भारताला नाकारत हिंदूंचा हिंदूस्थान हे बॅनर झळकले आहेत. त्यातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे.