जमीन नावावर करुन देण्यासाठी शेतकऱ्याला मारहाण; पुण्यात धनंजय देसाई यांना बेड्या!
जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकरी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे, 03 ऑगस्ट 2023 | जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकरी तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्यात पीडित तरूण गंभीररित्या जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह आणखी सहा जणांना अटक केली आहे.पुणे पोलिसांनी धनंजय देसाई याच्यासह त्याच्या साथीदारांना कोर्टात हजर केलं. कोर्टाने देसाई याच्यासह अटकेत असलेल्या सहाही जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.
Published on: Aug 03, 2023 07:35 AM
Latest Videos