गुन्हा दाखल झाल्यानं फरक पडत नाही, संतोष बांगर यांची रोखठोक प्रतिक्रिया
संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत कोणताही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे.
शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्यासह 35 ते 35 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांनी गुन्हा दाखल झाल्याने फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. कोल्हापूर, साकोली या ठिकाणी त्याच प्राचार्यावर अनेक गुन्हे दाखल झाले इतकेच नाहीतर १३ वेळा त्याची बदली करण्यात आली, असल्याचीही त्यांनी माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्याने कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. माझ्या आई-बहिणीची अब्रु जर कोणी चव्हाट्यावर आणत असेल तर त्याला त्याच पद्धतीने सबक शिकवला जाणार, असल्याचा संतोष बांगर यांनी इशारा दिला आहे.