पुणे अपघात प्रकरणावर अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा...

पुणे अपघात प्रकरणावर अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, बाल हक्क न्यायालयाचा निर्णय हा…

| Updated on: May 22, 2024 | 3:34 PM

शनिवारी रात्री पुण्यात कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीने एका दुचाकीला उडवलं. यात दुचाकीवरील अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. अशातच या प्रकरणात उडी घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता भाष्य केले आहे.

हिट अँड रन या प्रकरणामुळे फक्त पुण्यामधलंच नाही तर महाराष्ट्रातीलदेखील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणाही साधला आहे. शनिवारी रात्री पुण्यात कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीने एका दुचाकीला उडवलं. यात दुचाकीवरील अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. तर आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप विरोधकांकडून होतोय. अशातच या प्रकरणात उडी घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता भाष्य केले आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. दोषी वेदांत अगरवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी रोष व्यक्त केला आहे. तर बाल हक्क न्यायालयाचा निर्णय लाजीरवाना असल्याचेही अमृता फडणवीस यांनी ट्विट शेअर करत म्हटले आहे.

Published on: May 22, 2024 03:34 PM