गिरणी कामगारांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी, गृहनिर्माण मंत्री Atul Save यांची मोठी घोषणा काय?
VIDEO | महाराष्ट्र सरकार लवकरच गिरणी कामगारांसाठी घरांची मोठी सोडत काढणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडून आनंदाची बातमी
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | ‘महाराष्ट्र सरकार लवकरच गिरणी कामगारांसाठी 500 घरांची सोडत काढणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आज गृहमंत्री अतुल सावे यांनी मोठी घोषणा गिरणी कामगारांसाठी केली. गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्राप्त होणाऱ्या ठाणे जिल्हयातील रांजगोळी, रायचूर आणि रायगड जिल्ह्यातील कोल्हे येथे प्राप्त होणाऱ्या २ हजार ५२१ सदनिकांची सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे वक्तव्य अतुल सावे यांनी केले. सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १३१ यशस्वी पात्र गिरणी कामगार \ वारस यांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
