Sanjay Raut: या घटनेकडे महाराष्ट्रातील जनता कशी पाहते हे महत्त्वाचं- बाळासाहेब थोरात

| Updated on: Jul 31, 2022 | 12:27 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे.

“या घटनेकडे मी कसा पाहतो त्याहीपेक्षा महाराष्ट्रातील जनता याकडे कशी पाहते हे महत्त्वाचं आहे” असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशी (ED Enquiry) साठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. 10 ईडीचे अधिकारी राऊतांच्या (Sanjay Raut Shivsena) मैत्री बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या सगळ्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलीये काय म्हणालेत बघा…

संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा, भागवत कराडांची काय प्रतिक्रिया ?
Sanjay Raut: संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्याची शक्यता!