Fighter : जसा अभिजीत भारताचा Fighter, तशाच अटल आणि निष्पक्ष TV9 भारतवर्ष – ऋतिक रोशन

| Updated on: Jan 25, 2024 | 4:44 PM

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा 'फायटर' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, TV9 भारतवर्षसाठी हृतिक रोशनचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये हृतिक याने अभिजीत जसा भारताचा फायटर आहे, तसाच TV9 भारतवर्षच्या बातम्या निष्पक्ष आहे.

मुंबई, २५ जानेवारी, २०२४ : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर एरियल अॅक्शन ‘फायटर’ हा सिनेमा आज 25 जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘फायटर’ या चित्रपटातील हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर या चित्रपटात हृतिक फायटर पायलटच्या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. दरम्यान, हृतिक रोशनने TV9 साठी 34 सेकंदाचा व्हिडिओ तयार केला आणि त्यात तो त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणतो, ‘फायटर…आम्ही देशाचे रक्षक आहोत आणि TV9 भारतवर्ष सत्याची ढाल आहे. अभिजीत जसा भारताचा फायटर आहे, त्याचप्रमाणे TV9 भारतवर्षच्या बातम्या सत्य आणि निःपक्षपाती आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली आर्मी फायटर आणि सर्वात अचूक बातम्यांसाठी बघा TV9 Bharatvarsh च्या बातम्या… दरम्यान, TV9 भारतवर्ष दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ‘फाइटर’ चित्रपटाचा मीडिया पार्टनर आहे.

Published on: Jan 25, 2024 04:42 PM
महाविकास आघाडीत फूट अटळ, भाजपच्या ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा काय ?
मनोज जरांगे पाटील यांच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं, कुणी व्यक्त केली मोठी शंका?