Ram Mandir Ayodhya : ठरलं… ‘या’ तारेखेपासून अयोध्येतील राम मंदिर भक्तांसाठी होणार खुलं
VIDEO | २२ जानेवारीला दुपारी साडे बारा वाजता अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण स्वीकारलं आहे.
अयोध्या, 25 ऑक्टोबर 2023 | देशातील रामभक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. नवं वर्षातील २२ जानेवारी २०२४ पासून अयोध्येतील राम मंदिर सर्व भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी साडे बारा वाजता अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण स्वीकारलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याची माहिती दिली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नुकतेच पंतप्रधान मोदींना राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले होते. ट्रस्टच्या अधिकाऱ्याने पीएम मोदींचीही भेट घेतली, त्यानंतर पीएम मोदींच्या हस्ते होणाऱ्या रामाच्या प्रतिष्ठापन सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.