भ्रष्टाचार करता येत नसल्याने ते हताश; अतुल भातखळकर यांचा नाव न घेता निशाणा
VIDEO | ईडी अन्याय करते वाटत असेल तर न्यायालयात जावं, अतुल भातखळकर यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं, बघा काय म्हणाले...
मुंबई : कायदा सर्वांना सारखा आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई होणार, असे स्पष्टपणे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. ईडी अन्याय करते वाटत असेल तर न्यायालयात जावं. PMLA चा कायदा रद्द करावा या मागणीसाठी वर्षभरापूर्वी काही भ्रष्टाचारी नेते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. बॉम्बब्लास्ट इतका गंभीर गुन्हा हा मनी लाँड्रींगचा असे मत यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते. त्यामुळे पैशाचा स्त्रोत सांगा आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचण्याचा प्रयत्न करा, अशी खोचक टीकाही भातखळकर यांनी केला आहे. ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका देशातील विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती. त्या संबंधीचे पत्रही पंतप्रधान मोदी यांना लिहिले होते. यावर भाष्य करताना अतुल भातखळकर म्हणाले, एकीकडे भाजप गैरवापर करत असल्याचा आरोप करतात तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना पत्र लिहिता, विरोधी पक्षांची कीव येते. शेवटी ते हाताश आहेत, त्यांना भ्रष्टाचार करता येत नाही, असे म्हणत विरोधकांवर अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.