Igatpuri Waterfall : इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या 'सूनकडा'चं सौंदर्य

Igatpuri Waterfall : इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या ‘सूनकडा’चं सौंदर्य

| Updated on: Jul 13, 2024 | 1:07 PM

नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचं सौंदर्य खुलून निघालं आहे. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सूनाकडा धबधबा प्रवाहित झाला आहे. डोंगर माथ्यावर जास्त वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या अगदी कडेला हा धबधबा असल्याने याचे नाव सूनाकडा पडले आहे. बघा या धबधब्याचे सौंदर्य...

नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊसाने नागरिकांची दाणादाण उडवून दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, धरणं ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर लहान मोठे धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचं सौंदर्य खुलून निघालं आहे. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सूनाकडा धबधबा प्रवाहित झाला आहे. डोंगर माथ्यावर जास्त वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या अगदी कडेला हा धबधबा असल्याने याचे नाव सूनाकडा पडले आहे. हा विशाल धबधबा दोन भागात डोंगर माथ्यावरून कोसळतो. हा धबधबा मोठा असून पर्यटकांच्या नजरेस पडला नाही त्यामुळे इथे गर्दी कमी असते. त्यामुळे पर्यटनास जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा धबधबा पर्वणी ठरू शकतो. बघा या धबधब्याचे सौंदर्य…

Published on: Jul 13, 2024 01:07 PM