मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, प्रतिक्षेनंतर अखेर Monsoon ची एन्ट्री, पुढील ४८ तासात…
मान्सून दाखल झाल्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील पाच दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ही माहिती देताना हवामान खात्याने मुंबईतील पावसासंदर्भात यलो अलर्ट देखील दिला आहे. पुढील ४८ तासात पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.
मुंबईकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईत मान्सूच एन्ट्री झाली आहे. मुंबईत मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील पाच दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ही माहिती देताना हवामान खात्याने मुंबईतील पावसासंदर्भात यलो अलर्ट देखील दिला आहे. पुढील ४८ तासात पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. यासह मुंबईत आजपासून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. ११ जून रोजी ठाणे आणि रायगडमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर यासाठी ऑरेंज अलर्ट जारी कऱण्यात आला आहे. इतकंच नाहीतर मुंबईतील पावसाची तीव्रता आजपासूनच वाढण्याचा अंदाज देखील वर्तविला जात आहे.
Published on: Jun 09, 2024 12:04 PM