IMD Weather | कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 48 तासात कसा होणार पाऊस?
VIDEO | पुणे हवामान विभागाच्या संचालिका ज्योती सोनार यांनी येत्या 48 तासात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात कसा होणार पाऊस यांचा काय वर्तविला अंदाज?
पुणे, २ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतली होती मात्र आज पुन्हा मुंबईसह पुणे शहरात पावसाच्या सरी कोसळताना बघायला मिळालंय. येत्या ४८ तासात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कसा होणार, याचा अंदाज पुणे हवामान खात्यानं वर्तविला आहे. पुणे हवामान विभागाच्या संचालिका ज्योती सोनार यांनी अशी माहिती दिली की, आज कमी दाबाचे क्षेत्र विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत आहेत. पुणे आणि परिसरात येत्या दोन दिवसात मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणातील अस्थिरता वाढल्यामुळे सध्या पाऊस पडत आहे. कोकण गोव्यामध्ये आज व मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या ४८ तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जनेस विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण गोव्यामध्ये आज, मध्य महाराष्ट्र २ ते ४ सप्टेंबर मराठवाड्यामध्ये ३ ते ५ सप्टेंबर तर विदर्भामध्ये पुढील पाचही दिवस येलो अलर्ट दिलेला आहे. पुढील पाच ते सात दिवसांसाठी पुणे आणि परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे व परिसरात पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट दिलेला आहे.