AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?

अखेर भेटूही दिलं नाही अन्… पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?

| Updated on: Aug 12, 2026 | 2:54 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत एस. खान यांनी इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रकृतीबाबत सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत एस. खान यांनी इमरान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्याने आपण हा दावा करत असल्याचे वजाहत खान यांनी म्हटले आहे.

इमरान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्यामुळे त्यांना कुणालाही भेटू दिले जात नसल्याचा दावा पत्रकार वजाहत खान यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, इमरान खान यांच्या मृत्यूबाबत करण्यात आलेल्या या दाव्याची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

वजाहत एस. खान यांच्या दाव्यानंतर इमरान खान यांच्या समर्थकांमध्येही चिंता वाढली आहे. पाकिस्तानमध्ये आधीपासूनच राजकीय परिस्थितीवरून वातावरण तापलेले असताना या दाव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे. इमरान खान यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

दरम्यान, वजाहत खान यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानपुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावरही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Aug 12, 2026 02:53 PM

Follow Us